सातुळी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ जणांनी केले रक्तदान.
सावंतवाडी.
सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील सातुळी सारख्या छोट्याशा गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात युवती व महिलांसह तब्बल ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक युवा कार्यकर्ते दिनेश गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गजानन नाटेकर, सातुळी बावळाट ग्रामपंचायतचे सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे, शिवसेना विभागमुख आनंद वरक, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत गावडे, पोलीस पाटील अरुण परब, बाळू कानसे, श्रीराम कानसे, ओमकार परब, गिरीश गावडे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरातील रक्त संकलन कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालच्या रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ जयराज, अधिपरिचारक रणजीत केसरे, दत्तात्रय एवळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मन्सूर बारगीर, जयवंत कदम, उत्तम पाटील, राहुल धनवडे दामोदर कामत यांचे सहकार्य लाभले.या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना स्वराज्य ग्रुपच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले.