फुलपाखरांप्रमाणे नेत्रगोलचा वापर करून विद्यार्थ्यांनी अनेक विषयाचे ज्ञान प्राप्त करावे : सूरज मळीक.

फुलपाखरांप्रमाणे नेत्रगोलचा वापर करून विद्यार्थ्यांनी अनेक विषयाचे ज्ञान प्राप्त करावे : सूरज मळीक.

दोडामार्ग.

   फुलपाखरांप्रमाणे सर्व  (लेन्स) नेत्रगोलचा वापर करून विद्यार्थ्यांनी अनेक  विषयाचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. असे प्रतिपादन गोव्यातील फुलपाखरे  विषयाचे अभ्यासक अॅड.सुरज मुळीक यांनी केले.
     येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त सह्याद्रीतील फुलपाखरे  या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
 आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, सह्याद्रीच्या पट्ट्यातील गोवा आणि दोडामार्ग परिसरात फुलपाखरांसाठी आवश्यक असलेले सदाहरित घनदाट जंगल मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे त्यांची वाढ इथे मोठ्या प्रमाणात होते.पण त्यांना खाण्यासाठी अनेक कीटक आणि जीवजंतू टपलेली असतात.त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून निसर्गताच त्यांना मोठे डोळे व अनेक (लेन्स) नेत्रगोल प्राप्त झालेले असतात.काही फुलपाखरांच्या पाठीमागच्या पंखातही असे डोळे लपलेले असतात त्यामुळे त्यांना चारी बाजूचे दिसते.म्हणून ते इतर भक्षापासून आपले रक्षण करतात.
  फुलपाखरे दिवसापेक्षा रात्री आणि संधी प्रकाशाच्या वेळी अधिक संख्येने बाहेर पडतात.या फुलपाखरांना वाघ,बिबटे,तलवारीचे पाते, कागदाचे तुकडे व इतर वनस्पती सारखे रंग प्राप्त झालेले असतात.नरापेक्षा मादी मोठी असते.तिने अंडी घातल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पिलं बाहेर पडतात.नीलपरी हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे.आपल्या राज्याचे फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे.काही फुलपाखरे विषारी असतात त्यापासून सावधही राहिले पाहिजे.दोडामार्ग परिसरात फुलपाखराच्या अनेक जाती आढळतात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा.असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी राजेंद्र केरकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व सांगितले.तर प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव यांनी अध्यक्षीय समारोप केला.
 भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी.डी.गाथाडे यांनी केले. तर उपस्थित त्यांचे आभार कुमारी मानसी गवस हिने मानले.