शिरोडा येथे आयुष्यमान वय वंदना नोंदणी, मोफत कार्ड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोडा येथे आयुष्यमान वय वंदना नोंदणी, मोफत कार्ड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


 

शिरोडा

 

   शिरोडा येथील भाजप कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या आयुष्यमान वय वंदना कार्ड काढणे शिबिरामध्ये ६३ ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यमान वय वंदना कार्डची नोंदणी केली व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान वय वंदना नोंदणी करून मोफत कार्ड वितरीत करण्यात आले.या योजनेचा शिरोडा, आरवली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फायदा व्हावा म्हणून भाजप शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर व शिरोडा शहर भाजप अध्यक्ष अमित गावडे व तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांच्या संकल्पनेतून शिरोडा व आरवली भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हे शिबिर आयोजित केले होते. यावेळी शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख मयूरेश शिरोडकर, शिरोडा शहर अध्यक्ष अमित गावडे, तालुका युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गावडे, आरवली, रेडी, शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे महादेव नाईक, जगन्नाथ राणे, गजानन बांदेकर, शिरोडा बूथ अध्यक्ष अभय बर्डे, चंद्रशेखर गोडकर, प्रसाद परब, शिरोडा बूथ अध्यक्ष तथा वेंगुर्ला तालुका चिटणीस श्रीकृष्ण धानजी, माजी सरपंच शिरोडा अनुक्रमे विजय पडवळ, मनोज उगवेकर, शिरोडा भाजप ज्येष्ठ पदाधिकारी बबन आडारकर, अनिल गावडे, बाळकृष्ण परब, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य अर्चना नाईक, हेतल गावडे, शिरोडा भाजप महिला पदाधिकारी गंधाली करमळकर, समृद्धी धानजी, स्नेहा गोडकर, भाजप वेंगुर्ला कार्यकारणी सदस्य संतोष अणसूरकर, आरवली सरपंच समीर कांबळी, आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगावकर, शिरोडा भाजप पदाधिकारी विदयाधर धानजी, दादा शेट्ये, प्राजेश गावडे, आरवली माजी सरपंच, विदयमान सदस्य तातोबा कुडव, ग्रामस्थ प्रकाश मिशाळ, प्रशांत गावडे, आयुष्यमान वय वंदना कार्ड ऑपरेटर श्रध्दा धुरी उपस्थित होते.