देवगडमध्ये माजी आमदार राजन तेली यांची शिवसेनेतील पहिली संघटनात्मक बैठक उत्साहात

देवगडमध्ये माजी आमदार राजन तेली यांची शिवसेनेतील पहिली संघटनात्मक बैठक उत्साहात

 

देवगड 


     देवगड तालुका रेस्ट हाऊस येथे नुकत्याच झालेल्या आढावा  बैठकीत माजी आमदार राजन तेली यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतरची पहिली संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेना उपनेते संजय आंग्रे प्रमुख उपस्थित होते.
      बैठकीत विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुका प्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
      बैठकीदरम्यान संघटनेच्या वाढीसाठी सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक गावात शिवसेनेचा झेंडा अधिक बळकट करण्याच्या नियोजनावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप जयघोषांनी आणि एकसंघतेच्या निर्धाराने करण्यात आला.