सैनिक पतसंस्थेच्या संचालक मंडळाने घेतली नूतन जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट.

सिंधुदुर्ग.
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग या संस्थेच्या संचालक मंडळाने सिंधुदुर्ग जिल्हयाचे नुतन जिल्हाधिकारी श्री कीशोर तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर यांनी पुष्पगुच्छ देवुन जिल्हाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सैनिकांना भेडसावणा-या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. माजी सैनिकांची जिल्ह्यात बंद झालेली कॅन्टींगची सेवा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच ECHS सुविधा लवकरच नविन जागत करण्यासाठी पुर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासीत केले.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. चंद्रकांत शिरसाट, संस्थेचे संचालक श्री. दिनानाथ सावंत, श्री. सुभाष सावंत, श्री. शामसुंदर सावंत, श्री. भिवा गावडे, श्री. संताप मुसळे, श्री. शशिकांत गावडे, स्थानिक नियंत्रण समिती कुडाळ शाखेचे उपाध्यक्ष श्री. व्हीक्टर पिंटो व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ त्यांच्यासह माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.