परुळे येथे २३ जानेवारी रोजी ‘गीत रामायणाचे' आयोजन.

परुळे येथे २३ जानेवारी रोजी ‘गीत रामायणाचे' आयोजन.

वेंगुर्ला.

  लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड मार्फत गीत रामायण चे आयोजन परुळे येथे करण्यात आले आहे.लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवत असतो. याचाच एक भाग म्हणून आपणा सर्वांचे श्रद्धा स्थान असणारे प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येत श्री रामांच्या जन्मस्थानी त्यांच्या मूर्तीची पुनर्स्थापना होत आहे.  या क्षणाची आपण भाविकभक्त अनेक वर्ष वाट पाहात आहोत हा सुवर्ण क्षण जसजसा जवळ येत आहे तशी आपणा सर्वांची उत्सुकता वाढत चालली आहे हा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपण सर्वच आतुर आहोत हा आनंदक्षण साजरा करण्यासाठी मराठी मनाच्या अगदी जवळचे, "गीत रामायण" या सुंदर कलाकृतीचा आस्वाद सर्व भाविकांना मिळावा यासाठी आम्ही सांगली येथील "स्वरवैभव क्रिएशन" या संस्थेच्या कलाकारांचा संपूर्ण गीत रामायणच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.कार्यक्रम स्थळ आदिनारायण मंदिर परुळे कार्यक्रम वेळ २३ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ०५.३० वाजता.या कार्यक्रमास सहभागी होऊन सहकार्य करावे. या कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परुळे येथे देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यास आपण सहकार्य करावे. असे आवाहन  शाखा व्यवस्थापक लोकमान्य मल्टी.को. ऑप. सो.लि. शाखा परुळे यानी केले आहे.