बांदा येथे २२ ऑक्टोबर रोजी शालेय गटांसाठी भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

सावंतवाडी.
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधीचौक मित्रमंडळ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी शालेय गटांसाठी भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही स्पर्धा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात होणार आहेत.
स्पर्धेत पहिली ते चौथी गटासाठी पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे ५००, ३०० व २०० रुपये रोख पारितोषिक तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पाचवी ते दहावी गटासाठी पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे १०००, ५०० व ३०० रुपये रोख पारितोषिक तसेच चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी शिवम गावडे (मो. ९४२३५०२४७३) किंवा संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी केले आहे.