शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.

सावंतवाडी.

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक,राणी पार्वती देवी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक प्रविण बांदेकर सर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ शिक्षक भारती सिंधुदुर्गकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
   प्रा.बांदेकर हे गेली ३३ वर्षे अध्यापनाचे काम करीत होते. त्यांनी या काळात कविता कादंबरीकार आदींच लेखन केले. नामवंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या वाटचालीसाठी शिक्षक भारतीकडून अध्यक्ष संजय वेतुरेकर व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी केलेले शैक्षणिक व साहित्यिक कार्य हे अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली.
   याप्रसंगी जिल्हा सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, संघटनेचे माजी सचिव सुरेश चौकेकर, दीपक तारी, माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालिका डॉ. प्रा. सुमेधा नाईक, महिला आघाडी सचिव प्रगती आडेलकर, शिरीष प्रवीण बांदेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्षा शारदा गावडे, महेश पास्ते, विजय ठाकर, रमेश गावडे, विद्यानंद पिळणकर, माणिक पवार, अनिकेत वेतुरेकर, माधव लोखंडे, चंदन गोसावी, आनंदी मोर्ये, प्रा.दशरथ सांगळे, सुनील जाधव, राजाराम पवार आदी उपस्थित होते.