कोलगाव येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे बालक जखमी.
सावंतवाडी.
कोलगाव धुरीटेम येथील अक्षय महेश धुरी हा बालक घरामध्ये व्हरांड्यात बसलेला असताना भटक्या कुत्र्याने येऊन पायाच्या मांडीला चावा घेतला असून त्याच्या पायाला जखम झाली आहे.
यासाठी त्यांच्या वडीलांनी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे इंजेक्शन, औषधे व उपचार घेतला असून यामुळे सावंतवाडी तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.आज कुत्रा प्रेमी नागरिक बरेच असल्याने अशा प्रकारचे कुत्रा पाळत असताना याची दखल घ्यावी मध्यंतरी मळगाव मध्ये एकाच घरातील सात जणांना पाळीव कुत्रा पाळल्याने त्यांनी अशाच प्रकारचा चावा कुत्र्याने घेऊन मानसिक व शारीरिक त्रास या कुत्र्या पाळलेल्या मुळे झाला आहे.
सध्या पाळीव व भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असून काही सामाजिक कार्यकर्ते भटक्या कुत्र्यांचे लाड करताना दिसतात. कुत्रे घोळक्याने फिरत असल्याचा त्रास विद्यार्थी, वयोवृद्धांना होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या कुत्र्यांची नसबंदी करून घेतली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी यांनी कशा प्रकारचे निर्देश व आर्थिक तरतूद बजेटमध्ये करून सर्वसामान्य नागरी लहान बालके वृद्ध व महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण दिले पाहिजे.सध्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे दिवसेंदिवस लोकांच्या जीवनमानाला धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसेच रात्री अपरात्री कुत्र्यांचे भूकंणे आजारी, मधुमेह, रक्तदाब रुग्णांना त्रासदायक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसुरकर यांनी दिली आहे.