वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

 

वेंगुर्ले

 

       वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेंगुर्ला(अजितदादा पवार गट)स्वबळावर लढणार असल्याचे एकमताने ठरविण्यात आले. वेंगुर्ले कॅम्प येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक पार पडली  यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, जिल्हा सचिव सुशील चमणकर, युवा कार्यकर्ते अनंतराज पाटकर, शहरअध्यक्ष सुरज परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, महिला तालुकाध्यक्ष ऋतुजा शेटकर, शहराध्यक्ष सुचिता परब, ग्रामपंचायत सदस्य संदिप सातार्डेकर, राजेंद्र आमरे, तालुका युवा अध्यक्ष गजानन कुंभार, ओबीसी उपाध्यक्ष चंद्रशेखर मांजरेकर, सुप्रिया जाधव आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आगामी होणाऱ्या वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे काम करण्याची  सूचना देण्यात आली.