सावंतवाडी येथील इन्सुली रमाईनगर येथे महात्मा फुले जयंती साजरी

सावंतवाडी येथील इन्सुली रमाईनगर येथे महात्मा फुले जयंती साजरी

 

इन्सुली

 

     भीमगर्जना युवक मंडळ, इन्सुली रमाईनगर यांच्यातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजnमंदिर इन्सुली, रमाईनगर येथे प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष परेश जाधव यांचा हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्याचबरोबर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अनुक्रमे अनुजा जाधव व सविता जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु. सपना हिने महात्मा फुलेंच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी शेतकरी बांधवासाठी केलेली कामे आजच्या काळातही उपयोगी असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आजच्या राजकर्त्यांनी फुलेंचा आदर्श समोर ठेवून कामे केली तर शेतकऱ्यांच्या समस्या दुर होऊ शकतात असे व्यक्त केले. सिध्देश यांनी आपले विचार मांडताना महात्मा फुलेंचे नेतृत्व प्रामाणिक होते. परंतु सध्याचे नेतृत्व समाजाची दिशाभूल करणारे आहे असे व्यक्त केले.परेश जाधव यांनी समारोपीय मनोगतामध्ये फुलेंच्या जीवनावर माहिती दिली. तसेच सावित्रीबाईंना महिला शाळा चालवताना आलेल्या अनेक आव्हानांचा उल्लेख केला. तसेच  उपस्थितांचे आभार मानून अशा प्रकारचे कार्यक्रम करुन त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा उद्देश तुम्ही सार्थ करता असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी आनंद जाधव यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. यावेळी सचिव अरविंद जाधव, जेष्ठ सल्लागार लाडू जाधव, दिपेश जाधव, तेजस जाधव, मिथिल जाधव, संजना जाधव, वृषाली जाधव, स्मिता जाधव, दिपाली जाधव, स्म्रितिषा जाधव, सानिका जाधव, सृष्टी जाधव, कृतिका जाधव, गिताली जाधव, लैला जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार परेश जाधव यांनी केले.