लांजा येथे २५ ते २९ एप्रिल कालावधीत मोफत योग व प्राणायाम शिबिराचे आयोजन.

लांजा.
गंगाधर सेवा प्रतिष्ठान लांजा आणि जंगम समाज मंडळ रत्नसिंधु यांच्या वतीने रामदेव बाबा पंतजली योग समितीच्या मोफत योग आणि प्राणायाम शिबिराचे 25 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान दररोज सकाळी आणि सायंकाळी 6 30 ते 7:30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे राममंदिर बाजारपेठ लांजा येथे श्रीराम शिवा सन थिएटर येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात दररोज ओंकार, योगासने, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, जॉगिंग, आरोग्यासाठी आसने आदीचे प्रशिक्षण होणार आहे. या शिबिरात नामवंत योग मार्गदर्शक सहभागी होणार आहेत भारत स्वाभिमान ट्रस्टचे बापूजी पाडळकर याचे प्रमुख मार्गदर्शन आहे. मारुती अलकुटे, लक्ष्मण स्वामीं, विद्यानंद जोग,राजेंद्र जंगम, सुरेश झोरे, शिवाआप्पा उकळी, महेश बामणे, मंगेश बामणे, अभिजित जेधे ,प्रणव स्वामी,,निलेश जंगम, अक्षय गांधी, प्रल्हाद सालुंखे, सुधाकर कांबळे, श्रीधर जंगम आदी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.शिबिर प्रवेशसाठी मंदार भिंगाड्रे 9860983561 आणि प्रकाश उपशेट्ये 8830458653 यांच्या शी संपर्क साधावा. या शिबिरात प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर टी व्ही रावराणे आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत.