स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई......बांद्यात १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई......बांद्यात १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

कणकवली 


       स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (दि. ९ नोव्हेंबर) पहाटे मोठी कारवाई करत बांदा पोलिस ठाणे हद्दीत दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ₹१२,११,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गोवा-मुंबई महामार्गावरील हॉटेल कावेरी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास पार पडली. यात
        आरोपी आकाश नामदेव खोत (वय २५, रा. सलगरे, जि. सांगली), विठ्ठल पांडुरंग नाईक (वय ४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली) यांचेकडून मुद्देमाल ₹१० लाखांची इनोव्हा कार ₹२,११,२०० किमतीची गोवा बनावटीची दारू असा मिळून एकूण जप्ती – ₹१२,११,२०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला
        ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
         या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, तसेच पोलीस अंमलदार अमर कांडर व महेश्वर समजिसकर यांनी सहभाग घेतला.
       सदर प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.