वेळागर समुद्र दुर्घटना......चौथा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी सापडला

शिरोडा
शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी शुक्रवारी बुडालेल्या पर्यटकांपैकी चौथ्या पर्यटकाचा मृतदेह रात्री सागरतीर्थ समुद्रकिनारी सापडला आहे. फरहान असे त्याचे नाव आहे. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार मत्स्य विभागामार्फत पाठविलेल्या द्रोण द्वारे समुद्रात बुडालेल्या उर्वरित तीन पर्यटकांचा शोध सुरू आहे. तसेच किनारपट्टीवर आणि समुद्रातही फिशिंग बोटीद्वारे शोध सुरू आहे अशी माहिती तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.काल सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. कुडाळ व बेळगाव येथील दोन कुटुंबातील सदस्य फिरण्यासाठी शिरोडा समुद्रकिनारी आले होते. यातील ८ जण पाण्यात अंघोळीसाठी उतरली. मात्र अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हे ८ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले. त्यापैकी ४ जणांना स्थानिकांनी बाहेर काढले. त्यातील १ जण वाचला आणि तिघांचा मृत्यू झाला होता. तर चार जण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. त्यांचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र ते सापडू शकले नाहीत. रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले आहे. दरम्यान रात्री १० वाजण्याच्या सुमारास एकाचा मृतदेह सागरतीर्थ समुद्रकिनारी आढळून आला. फरहान असे त्याचे नाव आहे.उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. तिघांपैकी एक मृतदेह कडोबा किनाऱ्यालगत काही वेळापूर्वी दिसून आला पण तो पुन्हा पाण्यात वाहून गेला आहे. त्यात तिघांचा शोध सध्या द्रोन द्वारे, फिशिंग बोटीद्वारे आणि आणि प्रशासनामार्फत किनाऱ्यालगत सुरू आहे.