सुशांत नाईक यांच्या स्वखर्चातून होणार गाडादेवी मंदिराची डागडुजी.

सुशांत नाईक यांच्या स्वखर्चातून होणार गाडादेवी मंदिराची डागडुजी.

कणकवली.

   शहरात गाडादेवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील लादी खराब झाली आहे. ती बसविण्याचे काम युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक सुशांत नाईक स्वखर्चातून करणार आहेत.या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला.
   यावेळी गवापुरूष सदानंद उर्फ बाळा राणे, मंगेश राणे, अंबाजी राणे, संजय घाडी, दीपक परब, दत्ता साटम, मुरलीधर नाईक अनिल नाईक आदी उपस्थित होते. कणकवली शहरात गावराठीतील महत्वाचे गाडादेवी मंदिर हे पुरातन मंदिर आहे. मात्र, या मंदिरातील लादी खराब झाली होती. मंदिरात लादी बसवून देण्याचे काम सुशांत नाईक स्वखर्चातून करणार आहे. हे काम होणार असल्याने ग्रामस्थ व भविकांमधून  समाधान व्यक्त होत आहे.