नवरात्र पाचवा दिवस : देवीचे स्वरूप स्कंदमाता

नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा गजर आणि जागर करणारा सण. घरातील आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री ही दैवी रुपातील आपली तारणहार असते. मग ती आईच्या स्वरुपात माया करणारी असो, बायकोच्या स्वरुपात भक्कम साथ देणारी असो, बहिणीच्या स्वरुपात पाठीशी उभी राहणारी असो, किंवा मुलीच्या स्वरुपात निखळ प्रेम करणारी असो प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ असतेच. शारदीय नवरात्रीमध्ये, पाचवा दिवस देवी स्कंदमातेसाठी समर्पित आहे आणि या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो. स्कंदमातेचे स्वरूप आईसारखे ममताळू असून ती भगवान स्कंदांची आई आहे. स्कंदांना पाचवा दिवस आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय.भगवान शंकर व माता पार्वती ह्याचे सुपुत्र. स्कंद मातेचे स्वरूप हिला चार हात असून दोन हातात कमळपुष्प घेतली आहेत तिसऱ्या हाताची वरद मुद्रा असून शुभ्रवर्ण आहे. व चौथ्या हातात स्कंदाला धरले आहे. हीचे वाहन सिंह आहे. या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो.हिरवा रंग प्रजनन क्षमता आणि वाढ यांचे प्रतीक आहे. सौभाग्याच लेण अन् निसर्गाशी अजोड नाते असलेला प्रेरणादायी हिरवा रंग. समृद्धीचे आणि शांततेचे प्रतिक असलेला हिरवा रंग हा सौभाग्याच लेण म्हणून ओळखला जातो तसेच निसर्गाचे आणि हिरव्या रंगाचे अतुट असे नाते आहे. जग निर्माण करणारी, ते रुजवणारी, वाढवणारी आणि सांभाळणारी प्रत्येक गोष्ट स्त्रीलिंगी गणली जाते. ती पृथ्वी, धरिणी, माती, प्रकृती आणि स्त्री या पुनोर्जन्म देणाऱ्या सुफल मानल्या जातात. निसर्ग आणि स्त्रीमध्ये अभूतपूर्व असे नाते आहे. जे सृजनशीलता आणि रजस्वाचे प्रतिक दर्शवते. श्रावण महिन्यामध्ये ज्या प्रमाणे निसर्ग हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे फुलतो तशीच स्त्री सौभाग्याच लेण म्हणून हिरवा चुडा घालते.सौभाग्याचं लेण मानून स्त्री हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करतात. प्रत्येक सुवासिनींच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा अगदी शोभून दिसतो.हाच हिरवा रंग समृद्धीचे प्रतिक आहे. ही समृद्धी फुललेल्या शेतमळ्यातून आणि बहरलेल्या फुलापानांतून दिसून येते. झाडांची पानगळ झाल्यानंतर वसंतानंतर फुललेला निसर्ग मन प्रसन्न करतो. हे या हिरव्या निसर्गाची किमया आहे. माणसाने कितीही स्वतः सिमेंटच्या भिंतीमध्ये अडकवल तरी माणसाला सुखावतो तो निसर्ग असतो. असे या हिरव्या रंगाचे महत्त्व आहे.स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेण म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो. देवीला देखील हिरव्या रंगाच्या साडीची ओटी भरली जाते. यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो. हा रंग पोषकता आणि शांतता दर्शवतो. हिरवा रंग हा मूळ रंगांपैकी एक आहे. याचाच अर्थ निसर्ग निर्मितीमध्ये तो अनादी काळापासून आहे. त्यामुळे हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते. निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते. निसर्गासोबत घालवलेला काही काळ सुद्धा मन सावरतो आणि बहरवतो.