दाभोली इंग्लिश स्कूल येथे नवागत विद्यार्थ्यांचे शानदार स्वागत.

दाभोली इंग्लिश स्कूल येथे नवागत विद्यार्थ्यांचे शानदार स्वागत.

वेंगुर्ला.

   दाभोली इंग्लिश स्कूल येथे शनिवारी शाळेच्या पहिल्याच नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी गणेश अरवंदेकर पुरस्कृत सुपारी रोप वाटप करून स्वागत करण्यात आले. हरित सेना विभागाच्या वतीने लेझिम बँड वाजवून रोप घेवून मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी जागतिक तापमान वाढ बाबत जनजागृती व वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आले.
   यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आनंदाने व उत्साहाने संपन्न झाला.