सिंधुदुर्ग येथे २९ सप्टेंबर रोजी भूमि लोक अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय सिंधुदुर्ग येथे २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यांसाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. या लोक अदालतमध्ये जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांच्याकडील प्रलंबित अपील प्रकरणावर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपीलामधील दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करून अपील प्रकरणे कायम स्वरूपी निकाली काढण्यासाठी संबंधित नागरिकांनी किंवा अपीलकर्त्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित रहावे. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांच्याकडून या लोक अदालतीसाठी जास्तीत-जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.