वेंगुर्ला मदर तेरेसा स्कूलचे बी. डी. एस. परीक्षेत उज्वल यश
वेंगुर्ला
12 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बी.डी.एस.परीक्षेमध्ये इ. दुसरीतील विद्यार्थी कु.अन्वय जगदीश सापळे याने 89 गुण मिळवून सुवर्ण पदक, इ. तिसरीतील विद्यार्थ्यांनी कु. दिया योगेश धुरी हिने 90 गुण मिळवून रौप्य पदक व कु. सुजय प्रशांत परब याने 88 गुण मिळवून रौप्य पदक प्राप्त केले आहे. या यशामध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून शाळेचे मुख्याध्यापक फा. फॅलिक्स लोबो, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

konkansamwad 
