ऋषी पंचमी:ज्ञान आणि श्रद्धेचे प्रतीक

ऋषी पंचमी:ज्ञान आणि श्रद्धेचे प्रतीक

   

    आपल्या भारतीय संस्कृतीत देव-देवतांच्या उपासना, सण आणि व्रतांची एक अखंड परंपरा आहे. त्यातूनच भक्ती, शुद्धी आणि आचरणाचे उत्तम संस्कार जपले जातात. गणेशोत्सव हा मंगलमय पर्व येताच घराघरांत चैतन्य, उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण निर्माण होत. ह्या चतुर्थीपासून सुरू झालेल्या उत्सवाचे वेगवेगळे दिवस विशेष मानले गेले आहेत. त्यातच "ऋषी पंचमी" ह्या दिवसाला वेगळे महत्त्व लाभलेले आहे.ऋषी पंचमी हा दिवस आपल्या जीवनाला शुद्धता, संयम आणि ऋषींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानला जातो. आपल्याला वेदविद्या, संस्कार आणि धर्ममार्ग दिलेले ह्या सप्तऋषींच्या स्मरणाने हा दिवस पवित्र बना अस मानल जात.एकदा छोटासा उंदीर गणरायाच्या समोर आला. चंचल, खट्याळ पण जिद्दी. त्याच्या मनात सतत चोरी-दोरीचे विचार. गणराय मात्र करुणेन हसून त्याला म्हणाला, “तू माझ्यासोबत चल, माझ वाहन हो. तुझ्या चंचलपणावर मी आरूढ होऊन तुला स्थिरतेचा मार्ग दाखवीन.” आणि त्या दिवसापासून लोभाच्या प्रतीकाला ज्ञानाच्या अधिपत्याखाली स्थान मिळाल. चंचल, खट्याळ पण जिद्दी. गणेशोत्सवाच्या उत्साहात हा दिवस आपल्याला संयमाची व प्रामाणिकतेची आठवण करून देतो. या दिवशी मूषक (उंदीर) पूजनाची सुंदर परंपरा देखील आढळते. या दिवशी खास करून भाजी, पाटोळे, गोडपोळ्या, दुग्धपाक किंवा ऋषींना प्रिय असलेली साधी शाकाहारी पदार्थं नैवेद्यासाठी अर्पण केली जातात. यातून दोन संदेश दिले जातात. गणरायाचा वाहन म्हणून मोषक वर्णिला गेलेला असून त्यातून एक गहन संदेश प्रकट होतो  माणसाच्या मनातील चंचलता, वासनात्मक प्रवृत्ती आणि अविचारी चित्त हे मूषकासारखे असते. पण त्याच चित्तावर जेव्हा गणेशचरणांची अधीनता येते, तेव्हा तेच चित्त नियंत्रित होऊन आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा साथीदार ठरते. त्यामुळे मूषकपूजन ही फक्त प्रथा नाही तर विचारांचे एक गहन प्रतीक आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला आपल्या आध्यात्मिक परंपरांची, ऋषींनी दिलेल्या ज्ञानाची, आणि गणरायाच्या वाहनातून मिळणाऱ्या जीवनतत्त्वज्ञानाची आठवण करून दिली जाते. केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर जीवनाला पवित्रता व संतुलित दिशा देण्याचा हा दिवस आहे.

"शुद्धी, कृतज्ञता आणि संयम हीच खरी ऋषी पंचमीची शिकवण आहे."