प्रत्येक आपत्ती ही संशोधनाची संधी : कुलगरु माधुरी कानिटकर. आरोग्य विद्यापीठात आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय आविष्कार २०२४ चे उद्घाटन सपंन्न.

नाशिक.
आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या कुटुंबावर आपण जेथे राहतो त्या समाजावर जेव्हा कोणतीही आपत्ती येते तेव्हा त्यावर नवकल्पना मात करण्यात येते ती एक प्रकारची संशोधनाची संधीच असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)
प.वि.से.प.,अ.वि.से.प., वि.से.प., यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’आविष्कार-2024’
राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवाचे उद्घाटन समारंभास अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, मा. राज्यपाल कार्यालयाकडून गठित सल्लागार व परीक्षण
समितीचे अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, सदस्य डॉ. सुभाष केंद्रे, डॉ. भगवान जोगी, वित्तीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल अत्रे, सदस्य डॉ. विवेक साठे, डॉ. भिमराव पाटील, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाच्या मा. कुलगुरु
लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आजची युवा पिढी हे उद्याचे भविष्य आहे. भविष्यात येणाÚया अडचणी सोडविण्यासाठी युवकांनी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेला विकसित भारत / 2047 हा प्रकल्प
युवकांसाठी महत्वपूर्ण आहे. आविष्कार संशोधन महोत्सवासमवेत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या ‘ग्रीन कॅम्पस’ चा आनंद घ्यावा. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठाने विविध उपक्रम राबविले आहेत.पर्यावरण आणि संशोधन यांचा अनोखा मेळ या संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. समाजाची गरज ओळखून नाविन्यपूर्ण कल्पना अस्तित्वात आणणे गरजचे आहे.विद्यार्थ्यांनी देशपातळीवर नवा आविष्कार घडवून देशाच्या विकासात योगदान
द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ.मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, संशोधन ही काळाची गरज आहे. आविष्कार संशोधन महोत्सवाच्या माध्यमातून विविध विद्यापीठांचे व विद्याशाखांचे विद्यार्थी एकत्रितरित्या संशोधन प्रकल्प सादर करतात त्यातून नवीन कल्पना
घेऊन आपण संशोधनाचा चालना द्यावी. युवा विद्यार्थी हेच खरे विकसित भारताचे शिल्पकार आहेत त्यासाठी चिकाटी, ध्येयपूर्ती हे गुण आपल्यामध्ये विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मा. राज्यपाल कार्यालयाकडून गठित सल्लागार व परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.सुनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य विद्यापीठाचा आविष्कार संशोधन महोत्सव खरोखर अनोखा आहे. सर्व विद्यार्थी व संघव्यवस्थापक तत्मयतेने काम करतांना दिसत आहे. संशोधनाला चालना मिळावी यासाठी करण्यात आलेला प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल असे वाटते. या संशोधन महोत्सवात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले असून देशपातळीवर राज्याची उल्लेखनीय कामगिरी दिसत आहे. पदवी शिक्षणातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा ही या प्रकल्पामागे भूमिका आहे ती वास्तवात साकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.मनोजकुमार मोरे यांनी आविष्कार संशोधन महोत्सवाची माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला आविष्कार गीताचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यातील चोवीस विद्यापीठातील एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित
होते.