खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे  व्हॉलीबॉल स्पर्धा

 

वेंगुर्ला


   भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग पुरस्कृत व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 व 8 एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील कॅम्प मैदान येथे सायंकाळी 6:00 वाजल्यापासून या स्पर्धा होतील. सदर स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये 11000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये 7000 व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास 2500 व आकर्षक चषक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट स्मॅशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिबेरो, प्लेयर ऑफ टूर्नामेंट अशी वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येक सहभागी खेळाडूस मेडल दिले जाईल. या स्पर्धेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी संदीप - 9004855615 व सॅमसन - 9307386651 यांच्याशी संपर्क साधावा. तरी या स्पर्धेला जास्तीत जास्त खेळाडूंनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन स्पर्धेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.