पोखरण येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

पोखरण येथे कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

कुडाळ

 

       डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिदूतांनी पोखरण गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या मार्गदर्शन सत्रात बियाणे उपचार, पिक संरक्षण, तसेच एकात्मिक किडव्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे ज्ञान मिळावे आणि उत्पादन वाढीस मदत व्हावी, हा उद्देश या उपक्रमामागे होता.या प्रसंगी पोखरण ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. समीक्षा जाधव, ग्रामसेविका सौ. पाटील मॅडम, तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.