बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत वेंगुर्ला पोलिस स्टेशनची केंद्रीय समितीकडून पाहणी.

बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत वेंगुर्ला पोलिस स्टेशनची केंद्रीय समितीकडून पाहणी.

वेंगुर्ला.
 
     बेस्ट मॉडेल पोलीस स्टेशन अंतर्गत देशातून 10 अव्वल पोलीस स्टेशन निवडण्यात येणार असून त्याअंतर्गत वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे परीक्षण सुरू असून केंद्रीय गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील द्विसदस्यीय  समितीने वेंगुर्ला पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस स्टेशन कामकाज, आवार परिसर, कामकाज व्यवस्था, आधुनिकीकरण साफसफाई व अन्य घटकांची पाहणी करण्यात आली. तसेच या समितीने उभादांडा श्री सागरेश्वर समुद्रकिनारी भेट दिली व नागरिकाशी संवाद साधला. यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पीएसआय शेखर दाभोलकर, सुरेश पाटील, रंजीता चौहान, मनोज परुळेकर, अमर कांडर , परशुराम सावंत, उभादांडा ग्रामपंचायत सरपंच निलेश चमणकर, सदस्य परुळेकर, पोलीस पाटील नार्वेकर, स्थानिक मच्छिमार बांधव उपस्थित होते.दरम्यान वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत समितीने समाधान व्यक्त केले आहे.