माडखोल येथे इर्टिगा आणि दुचाकीमध्ये अपघात

सावंतवाडी
इर्टिगा कारचालकाने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात बसची वाट पाहणाऱ्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून तिला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बाळूमामांचे दर्शन घेऊन परत येत असताना तळवडे येथे जाणाऱ्या एका चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना त्याने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे.