देवगड तालुक्यातुन ३.३१ लाखांचा अवैध खत साठा जप्त

देवगड तालुक्यातुन ३.३१ लाखांचा अवैध खत साठा जप्त

 

 

देवगड

 

   देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3.31 लाखांचा अनधिकृत खतसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यांना कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषीसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल, रा. कुणकेश्वर, कातवणेश्वर हे अवैधरित्या रासायनीक व सेंद्रीय खताचा साठा व विक्री करत असल्याचे दिसुन आले. याबाबत संबधित मालकाला विचारले असता त्यांच्याजवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आल्यावर शेतमांगराची तपासणी करण्यात आली.  त्यामध्ये  'महाराष्ट्र बायो' फर्टीलायजर इंडिया प्रा.लि या कंपनीच्या पिशव्या ज्यांची किंमत रु.1,52,100 -/-  आणि 'यारा' फर्टीलायजर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या पिशव्या ज्यांची किंमत  रु. 1,79,200 -/- असा एकूण रु. 3,31,300 -/-  किंमतीचा अवैध खतसाठा आढळुन आला. हा खतसाठा सील करून जप्त करण्यात आला आहे आहे. या प्रकरणी संबंधित खत विक्रेत्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.