सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलम १४४ लागू.

सिंधुदुर्ग.
जिल्ह्यातील महाराष्ट्र विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदासंघ निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे अधिकाराचा वापर करून दिनांक 11 जून 2024 रोजी 20 वाजलेपासून ते 5 जुलै 2024 रोजी 24 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये संपूर्ण भूभागात मनाई आदेश जारी केला आहे.