दिल्लीतील ऑल इंडिया थल सेना कॅम्पसाठी वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर कॉलेजच्या एन.सी.सी च्या मुलींची निवड.
वेंगुर्ला.
दिल्ली येथे सुरु होणाऱ्या ऑल इंडिया थल सेना कॅम्पसाठी बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील एन. सी.सी. च्या जुनीयर अंडर ऑफिसर सोनाली संतोष चेंदवणकर आणि सार्जंट दिव्या यशवंत दळवी या दोन मुलींची निवड झाली असून संपूर्ण देशातून फायरिंग, ओबस्टॅकल ट्रेनींग, हेल्थ व हायजीन, मॅप रिडींग मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एनसीसी कॅन्डीडेट्सनाच केवळ या ऑल इंडिया थल सेना कॅम्पमध्ये सहभागी होण्याची व आपल्या महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल करण्याची संधी दिली जाते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, एन.सी.सी ऑफिसर लेफ्टनंट बी.जी.गायकवाड व संपूर्ण स्टाफ यांनी या दोन्ही कॅन्डीडेट्सना त्यांच्या या निवडीबद्दल व महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल केल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ऑल इंडिया थल सैनिक शिबिर हा एक लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो एनसीसी कॅन्डीडेट्स च्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित करण्यावर भर देतो. त्याचबरोबर ग्राउंड फोर्सेसवर विशेष भर देऊन लष्करी जवानांचे कौशल्य आणि शिस्त वाढविण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. या कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या कॅन्डीडेट्सना CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवण्यास मदत करते.