राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल परुळे बाजार ग्रामपंचायतीचा सन्मान

राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल परुळे बाजार ग्रामपंचायतीचा सन्मान

 

परुळे
 

       मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा वेंगुर्ला येथे संपन्न झाली यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल परुळे बाजार ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आले असून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायतीस गौरविण्यात आले. या गौरव प्रसंगी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, नमिता परुळेकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व बाबींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.