आजी-आजोबा रमले नातवंडांच्या शाळेत.
वेंगुर्ला.
मदर तेरेसा स्कूल वेंगुर्ला येथे आजी - आजोबा दिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना शाळेमध्ये आमंत्रित केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. चंद्रकांत पेडणेकर व सौ.पेडणेकर यांनी भूषविले. पालक शिक्षक संघ सदस्या सौ.शर्मिला आसोलकर तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागत गीताने करण्यात आली.त्यानंतर आजोबाआजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लहान मुलांनी आपल्या नृत्याने तसेच सुंदर अशा नाटिकेने सादर केले.आजी आजोबांचे स्थान मुलांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते सांगितले.शाळेतील सहाय्यक शिक्षिका श्रीम.विरजींन फर्नांडिस यांनी आजी-आजोबांबद्दल सुंदर विचार मांडले.सर्व आजीआजोबांचे प्रतिनिधित्व करणारे श्री.चंद्रकांत पेडणेकर यांनी सर्वांशी आपल्या आयुष्यातील काही आठवणी सांगितल्या सर्व आजी आजोबांना त्यांच्या आयुष्यातले चांगले वाईट प्रसंग आठवणीत आणून दिले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो यांनी शाळेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थी वेदांत आसोलकर व कुमारी गार्गी गावडे यांनी केले.तर सर्वांचे आभार सहा. शिक्षिका ग्लॅग्निस पिंटो यांनी मानले.