गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

गोवा बनावटीची दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक

 

सावंतवाडी

 

      गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख, ५६ हजार किमतीच्या ५४ दारू बॉक्ससह  एकूण ११,५६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई किनळे येथील माऊली मंदिर स्टॉपजवळ करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बसत्याव घोन्सालवीस उर्फ बंटी (रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) आणि तुकाराम नाईक (रा. किनळे, ता. सावंतवाडी) हे त्यांच्या MH07/AG/9737 क्रमांकाच्या बलेनो गाडीतून गोवा बनावटीची दारू घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात विविध ब्रँडच्या ५४ बॉक्स दारूचा साठा मिळून आला, ज्याची किंमत सुमारे ३,५६,००० आहे. पोलिसांनी दारूसह ८ लाख किमतीची बलेनो गाडीही जप्त केली.याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश अरवारी हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राठोड, हवालदार डिसोजा, तवटे, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल समजिस्कर यांनी केली.