आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग भाजपा तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहल.

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग भाजपा तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक सहल.

देवगड.

    कणकवली मतदार संघातील आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयाच्या निमित्ताने विजयदुर्ग भाजपच्या वतीने येथील ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन करण्यात आले आहे.आज सकाळी आठ वाजता ही धार्मिक सहल आडिवरे महाकाली मंदिर, पावस येथील स्वामी स्वरुपानंद तसेच सुर्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली.45 नागरिक तसेच गरजू भाविकांनी याचा लाभ घेतला.या उपक्रमामुळे विजयदुर्ग येथील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान विजयदुर्ग डेपोवर प्रवासापुर्वी प्रभारी सरपंच रियाज काझी यांच्या हस्ते नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून ही धार्मिक सहल मार्गस्थ झाली.
   यावेळी पडेल मंडल भाजप महिला अध्यक्षा संजना आळवे, माजी पंचायत समिती सदस्या शुभा कदम, माजी सरपंच प्रसाद देवधर, माजी उपसरपंच महेश बिडये, विजयदुर्ग शक्ती केंद्रप्रमुख ग्रेसीस फर्नांडिस, बुथ प्रमुख महेश चव्हाण,निलेश मणचेकर,विनायक चोडणेकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.