छत्रपती संभाजीनगर शहरात 'मिस्टर युनिव्हर्स २०२३' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.

छत्रपती संभाजीनगर शहरात 'मिस्टर युनिव्हर्स २०२३' आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.

छत्रपती संभाजीनगर.

    दिनांक २३ ते २७ ऑक्टोबर २०२३, रोजी भारतामध्ये, महाराष्ट्रात ऐतिहासिक छ. संभाजीनगर, (औरंगाबाद) येथे मिस्टर युनिव्हर्स जागतिक, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्याने शरीरसौष्ठव खेळासाठी राष्ट्रीय जागतिक स्पर्धांचा आयोजन घेण्याचं मानस-धाडस, डॉ. संजय मोरे यांच्या कुशल नेतृत्वातून कल्पनेतून साकारले जात आहे. स्पर्धेसाठी ५० हुन अधिक देश राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय -१५००, खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धा इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या मान्यतेने व इंडियन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशन यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
   दि. २२ ते २७ ऑक्टोबर २०२३ रोजी, भारतामध्ये महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, ( औरंगाबाद) एमजीएम क्रीडा संकुल, व विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर, संभाजीनगर, औरंगाबाद येथे इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF) व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन MBBA) यांच्या संयुक्त विद्यमाने, आंतरराष्ट्रीय जागतिक स्तरावरील "मिस्टर युनिव्हर्स २०२३" ही आंतरराष्ट्रीय मानाची, भूषणात्मक स्पर्धा योजनेचा मान भारताला मिळाल्याने ही स्पर्धा महाराष्ट्रात घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय संघटनेबाबतीत इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF) ही राष्ट्रीय संघटना असून, अध्यक्ष संजय भाई जोशी आहेत तर डॉ. संजय मोरे जनरल सेक्रेटरी आहेत. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन (MBBA) अध्यक्ष पै. आमदार, महेश दादा लांडगे असून सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर व नरेंद्र कदम आहेत. ही राज्य संघटना राज्यस्तरावरील क्रीडा व खेळाच्या खेळाडूंच्या विकासासाठी कार्यरत असणारी पंजीबद्ध संघटना आहे.
   महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन (MBBA) ही राज्य संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन (MOA) व महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद यांना मान्यता प्राप्त संघटना आहे. "भारत श्री व ज्युनिअर भारत श्री जूनियर महाराष्ट्र श्री " श्री सीनियर महाराष्ट्र इतिहासात प्रथमच एकाच वेळी पाच स्पर्धाचे आयोजनाचा धाडस संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. दिनांक २२, २३, २४, ऑक्टोबर २०२३, रोजी मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा दिनांक २५ ऑक्टोबर रोजी "ज्यु. भारत श्री" व " वरिष्ठ भारत श्री दि. २६ ऑक्टोबर रोजी 'ज्यु महाराष्ट्र श्री व वरिष्ठ " महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन एकाच वेळी खेळाडूंना या स्पर्धा खेळण्याकरिता सोयीचे जाणार आहे.
   आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्याचे मूळ उद्दिष्ट खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भरमसाठ जाणेने प्रवास त्या ठिकाणी होणारा खर्च भारतातील खेळाडूंना शक्य होत नाही. जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतामध्ये भरवण्याचं व शरीरसौष्ठव हा खेळ अत्यंत ग्रामीण भागापर्यंत प्रचार प्रसार व्हावा याव्यतिरिक्त तरुण वर्ग व्यसनांपासून अलिप्त व्हावा व्यायामाचा व्यासंग तरुणांनी निष्ठापूर्वक जोपासावा, तरुण पिढीही शरीराने डौलदार व डेव्हलप व्हावी युथ डेव्हलपमेंट हाच खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवण्याचा मुख्य उद्देश आहे.
   इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आयोजित महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन (MBBA) यांच्या सहकार्याने १) सन २००९ रोजी औरंगाबाद येथे आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २) सन २०११ येथे ६५ वी जागतिक, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आलेती होती. ३) सन २०१७ रोजी मुंबई येथे जागतिक "मिस्टर ओलंपिया" या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ४) सन २०१८ रोजी, मुंबई येथे आहे "डायमंड कप या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. ५) सन २०१९ रोजी औरंगाबाद येथे "डायमंड कप ", या आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धा संघटनेच्या वतीने आयोजित करून आजवर यशस्वीपणे स्पर्धेचा आयोजन केलेला आहे.
    इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF) या राष्ट्रीय संघटनेला इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन (IFSS) अध्यक्ष डॉ. राफेल संतोजा,व जनरल सेक्रेटरी डॉक्टर संजय मोरे आहेत. आशियाई फिटनेस व बॉडी बिल्डिंग फेडरेशन (AFBF) यांची मान्यता असून, आंतरराष्ट्रीय संघटनेला वाडा, (WADA) स्पोर्ट अॅकॉर्ड वर्ल्ड गेम, इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी, (IOC) यांची मान्यता आहे. राष्ट्रीय फेडरेशनला एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग फिटनेस (AFBF) यांची मान्यता आहे. आशियाई फेडरेशन यांना ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) यांची मान्यता आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF) व महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन (MBBA) आयोजित करण्यात आलेल्या आहे. "मिस्टर युनिव्हर्स. " शरीरसौष्ठव चैम्पियनशिप साठी जागतिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या जवळपास दोन कोटी रुपये आर्थिक खर्च होणार आहे. आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धक तसेच अंतरराष्ट्रीय अधिकारी यांची सुखसोयी गरजेच्या सुविधांसाठी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये पदाधिकारी व खेळाडूंसाठी भोजन, निवास व्यवस्था निशुल्क करण्यात येणार आहे. आयोजनासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. सदरील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधील पारितोषिक आयोजन इतर सर्व बाबींसाठी अंदाजे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता, या स्पर्धेसाठी होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याकरता आयोजनाकरता चालू आर्थिक वर्षात आर्थिक जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करण्याचे संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.
   या होऊ घातलेल्या इंडियन बॉडी बिल्डिंग, आशियाई बॉडी बिल्डिंग व इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. संजय मोरे यांनी स्पर्धेबाबत सखोल माहिती दिली. यावेळच्या पत्रकार परिषेला फेडरेशनचे कोषाध्यक्ष राजेश सावंत, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर, नरेंद्र कदम, राजेश सावंत, नंदकुमार खानविलकर तसेच महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी सोबतच २९ जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.