कणकवलीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

कणकवलीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह


कणकवली


         कणकवली शहरातील महापुरुष कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या इमारतीलगत टेकून बसलेल्या स्थितीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. इमारतीजवळ दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पाहिले असता सदरचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, सागर शेगडे, पांडुरंग पांढरे, भूषण सुतार दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु असून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी त्या युवकाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.