स.का. पाटील महाविद्यालय, मालवणच्या दोन खेळाडूंची मुंबई विद्यापीठ संघात निवड
मालवण
स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथील कु. अनुष्का चंद्रशेखर आंबेरकर आणि कु. गार्गी संजय जुवेकर या दोन प्रतिभावान खेळाडूंची Inter University Cricket Tournament साठी मुंबई विद्यापीठाच्या क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे.
या दोन खेळाडूंनी Winners Sports Academy, मालवण येथे संदीप पेडणेकर, ज्ञानेश केळुसकर आणि सुशील शेडगे या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या कठोर मेहनतीचा आणि योग्य प्रशिक्षणाचा हा यशस्वी परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, क्रीडा विभाग तसेच Winners Sports Academy कडून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. Inter University Cricket Tournament मध्ये त्या दोघी उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

konkansamwad 
