परुळे येथे भव्य महारक्तदान शिबिर.....नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा

परुळे येथे भव्य महारक्तदान शिबिर.....नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा

 

परुळे

 

       दि. १० जानेवारी २०२६ रोजी जि. प. शाळा, आजारवाडी, परुळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज, रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या माध्यमातून भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
      रक्तदान हे अत्यंत महत्त्वाचे असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. या शिबिरात सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली रक्तसंकलन करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिक, युवक व रक्तदाते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आयोजकांनी कळविले आहे.
      या भव्य महारक्तदान शिबिराच्या आयोजनामुळे परुळे आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.