परुळे बाजार ग्रामपंचायतीची ‘टीबी मुक्त’ पडताळणी; चंदेरी प्रमाणपत्रासाठी मूल्यांकन
परुळे
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाचा एक भाग म्हणून टीबी मुक्त ग्रामपंचायत पडताळणीसाठी समितीने नुकतीच परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देऊन सविस्तर पडताळणी केली.या समितीत प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विनी माईणकर-सामंत, आरोग्य निरीक्षक एन. आर. नाईक व शेखर कांबळी यांचा समावेश होता. समितीचे स्वागत सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभु आणि ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी केले.यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी काजल परब, वैष्णवी पाटकर, आरोग्य सहाय्यक मनोज दूधवडकर, आरोग्य सेवक एस. आर. चव्हाण तसेच आशा सेविका राजलक्ष्मी परळेकर, कोमल मांजरेकर आदी उपस्थित होते. समितीने अभियानांतर्गत ठरविण्यात आलेल्या निकषांनुसार ग्रामपंचायतीचे सविस्तर मूल्यांकन केले. परुळे बाजार ग्रामपंचायतीने गतवर्षी ‘टीबी मुक्त’ अभियानात उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक मिळवले होते. यावर्षी चंदेरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ही पडताळणी करण्यात आली. दरम्यान, समितीने चीपी व कुशेवाडा ग्रामपंचायतीलाही भेट देऊन तेथील कामकाजाची पडताळणी केली. टीबी निर्मूलनासाठी ग्रामस्तरावर करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

konkansamwad 
