गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करून सरकारचा जनतेला दिशाभुल करण्याचा प्रयत्न : इर्शाद शेख.

गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करून सरकारचा जनतेला दिशाभुल करण्याचा प्रयत्न : इर्शाद शेख.

सावंतवाडी.

   सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपये कमी करण्याची घोषणा केली आहे. महागाईमुळे केंद्र व राज्य सरकार विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता निवडणूका जवळ आल्यामुळे आपण कसा जनतेचा विचार करतो हे दाखवण्यासाठी गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याचे नाटक सरकार करत आहे, अशी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली. 
   दरम्यान सरकारला जनतेच्या सुख दुःखाशी काही देणे घेणे नाही यांना फक्त निवडणूका जिंकायच्या आहेत. एप्रिल 2021 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 379 रुपये वाढ करण्यात आली आहे आणि आता फक्त 200 रुपये कमी करून जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या सरकारला येत्या निवडणुकीतच नाही तर आता सुद्धा सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी खरमरीत टीका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.