पाट कॉलेजचा दर्शन पडते भालाफेक क्रीडा प्रकारात राज्यात सर्वप्रथम.

पाट कॉलेजचा दर्शन पडते भालाफेक क्रीडा प्रकारात राज्यात सर्वप्रथम.


     बालेवाडी पुणे येथे 17 वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यात एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटच्या 
 कुमार दर्शन दशरथ पडते इयत्ता अकरावीच्या वियार्थ्याने 17 वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करत (47.45 मीटर) राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याची निवड  दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झालेली आहे.
    दर्शन पडतेच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे, त्याचे मार्गदर्शक -क्रीडा शिक्षक, पालक  यांचे संस्था, विद्यालय पंचक्रोशीतील पालक, मेढा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी  यांच्या कडून विशेष कौतुक होत आहे.