आंबोली जकातवाडी येथे आढळून आला एक हत्ती

सावंतवाडी
सावंतवाडी आंबोली येथील जकातवाडी येथे एक हत्ती दाखल झाला असून स्वामी समर्थ मठ येथून जकातवाडी येथील अनिल चव्हाण यांच्या घरासमोरील अनंत विसावा हॉटेल व तेथील झुडूपात दिसून आला आहे. कुत्र्यांनी जेव्हा भोकायला सुरुवात करून कल्ला केला त्यावेळी वन विभागाच्या वन क्षेत्रपाल प्रमिला शिंदे, वन रक्षक वासुदेव खोत, बदाम राठोड, वसंत गावडे, बाळा गावडे, शिवराम गावडे रेस्कू टीम चे प्रथमेश गावडे, राकेश अमृस्कर यांनी या ठिकाणी पाहणी केली. मात्र, हत्ती काळोखात घुटमळत राहिला तदनंतर पुन्हा काही वेळाने तिथेच दिसून आला. यावेळी जकातवाडी तसेच बाजार वाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हत्ती बघण्यासाठी आतुर होते.