टीम इंडिया २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चे चॅम्पियन्स, १२ वर्षानंतर टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरल
दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच रोहित सेनेच स्वप्न अखेर पूर्ण झाल आहे. भारताने या स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद मिळवल आहे.शेवटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजा ने ४९ व्या शतकाच्या अंतिम चेंडूत चौकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा याने ७६ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. त्यावर शुभमन गील, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या व के. एल. राहुल यांनी विजय सुनिश्चित केला.या विजयानंतर भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.भारताने प्रथमतः साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत न्यूझीलंडचा धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरल. न्यूझीलंडने अंतिम फेरीत विजयासाठी 252 धावाच आव्हान ठेवल होत. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून पूर्ण केल.12 वर्षानंतर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल आहे.सर्वत्र भारतीय संघाच्या कामगिरीच कौतुक होऊन विजयी जल्लोष साजरा होत आहे.