वेंगुर्लेत २१ मार्चपासून भगवा चषक अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्लेत २१ मार्चपासून  भगवा चषक अंडरआर्म नाईट क्रिकेट  स्पर्धेचे आयोजन

 

वेंगुर्ला


       श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ, म्हाडा व वेंगुर्ले शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने "भगवा चषक अंडरआर्म नाईट क्रिकेट" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ले कॅम्प येथील म्हाडा वसाहतीत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा २१, २२ व २३ मार्चला रात्रीची खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १७ हजार ७७७, उपविजेत्या संघाला ११ हजार १११, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी ३ हजार ३३३ रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या संघाला भगव्या चषकाने सन्मानित करण्यात येणार असून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व सामनावीर आदी पारितोषिके देण्यात येतील. या स्पर्धेत मठ, वडखोल, वेंगुर्ले, अणसूर-नाका, भेंडमळा, आडारी, मूठ, उभादांडा, बागायतवाडी, दाभोसवाडा, नवाबाग, भटवाडी येथील संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी सदानंद मुळे (९४०४३९६०७६) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.