आंबोलीच्या प्रथमेश गावडेची महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड.

आंबोलीच्या प्रथमेश गावडेची महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड.

सावंतवाडी.

   तालुक्यातील आंबोली सतीचीवाडीचा सुपुत्र कु. प्रथमेश पुंडलिक गावडे याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिनियर खेळाडूंच्या २३ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. प्रथमेश गावडे सावंतवाडी येथे देशभक्त गव्हाणकर कॉलेज मध्ये बीएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे.
   प्रथमेश गावडे या अगोदर महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघातून खेळत होता. त्यानंतर बी. बी. सी. आय तर्फे राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणीमध्ये त्याला सहभागी करण्यात आलेले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्याच सत्रात सोलापूर संघातर्फे खेळत त्याने दर्जेदार आणि दमदार खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. राष्ट्रीय पातळीवर बी बी सीआय तर्फे घेण्यात येणाऱ्या कूच बिहार ट्रॉफी आणि विणू माकंड ट्रॉफी मध्येही त्याने दमदार खेळाचे प्रदर्शन करून दाखवले आहे. फास्ट बॉलर तसेच तडफदार फलंदाज म्हणून खेळताना त्याने सर्वच पातळीवर आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन सर्वाना दाखवून दिलेले आहे. प्रथमेश गावडे हा सांगेली - घोलेवाडी येथील बापू आईर यांचा तो नातू असुन त्याच्या यशामागे त्याची आई उज्वला पुंडलिक गावडे आणि वडील पुंडलिक गावडे (माजी सैनिक) यांचे अहोरात्र प्रयत्न आहेत.या निवडबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.