टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यामंदिराच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यामंदिराच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

कणकवली.

    सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यामंदिराच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.
रुता जोशी व साहिर खांबे यांनी गोल्ड मेडल पटकाविले. शौर्य नाणचे, सक्षम धनवे, संबोधी मुंबरकर यांनी सिल्व्हर मेडल पटकाविले. आरोही जगदाळे, लौलिक मुंडले, कनिष्का दळवी, वृद्धी घाडी यांना ब्रॉन्झ मेडल पटकाविले. ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीलमध्ये पाथ तेली, शौर्य नाणचे गोल्ड मेडल पटकाविले. शाहिर खांबे. रूता जोशी यांनी सील्व्हर तर रुद्र मराठे याने ब्रॉन्झ पटकाविले. आलिम्पियाड परीक्षेत पार्थ तेली व शौर्य नाणचे यांनी गोल्ड मेडल पटकाविले. विद्यार्थ्यांना श्रीमती करंबेळकर, मयुर जाधव, श्रीमती खुडकर, श्रीमती शिरकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, श्री. तवटे, महानंदा पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.