असा असेल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक कार्यक्रम
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निवडणुका ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
- नामनिर्देशनपत्र छाननी: २२ जानेवारी २०२६
- उमेदवारी माघारी घेण्याचा अंतिम दिनांक: २७ जानेवारी २०२६
- अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३:०० वाजेपर्यंत)
- मतदान: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते ५:३०)
- मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १०:०० वाजलेपासून)
मतदारांची माहिती
- एकूण मतदार: ५९९५६४ (स्त्री- ३०१९०३, पुरुष- २९७६६०, इत्तर- ०१)
- मतदार यादी: राज्य निवडणूक आयोगाकडील mahasecvoterlist.in अॅपचा वापर करून मतदार यादीतील नावे शोधता येतील.
उमेदवारांची माहिती
- जिल्हा परिषद सदस्य संख्या: ५० (अजा- ३, अ.ज- ०, नामाप्र- १३, सर्वसाधारण ३४)
- पंचायत समिती सदस्य संख्या: १०० (अजा- ५, अ.ज- ०, नामाप्र- २२, सर्वसाधारण ७३)
- उमेदवार खर्च मर्यादा: जिल्हा परिषद सदस्य ६ लाख रुपये
निवडणूक प्रक्रिया
- एकूण मतदान केंद्रांची संख्या: ८१९०
- आवश्यक निवडणूक निर्णय अधिकारी संख्या: ०८
- आवश्यक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संख्या: ०८
- मतदान केंद्रावर आवश्यक कर्मचारी संख्या: ४३५० पेक्षा अधिक
- सदर निवडणुका EVM वर घेण्यात येणार आहेत.
- आवश्यक EVM सी. यु. १०६१, बी. यु. २११६

konkansamwad 
