नाम.नारायण राणे यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क.

नाम.नारायण राणे यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क.

कणकवली.

   वरवडे-फणसनगर येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांच्या पत्नी नीलम राणे, स्नुषा प्रियांका नीलेश राणे यांनी मतदान केले.
   तीन लाखांच्या मताधिक्याने आपण विजयी होणार असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.  वाढता उष्मा लक्षात घेता मतदारांनी सकाळाच्या सत्रात मतदान करावे, असे  आवाहन राणेंनी केले. अबकी बार 400 पारसाठी तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोकणाया माणसांना अर्थिक समृद्धी देण्यासाठी येथील मतदारांनी मला विजयी करण्यााो निश्चित केले असल्याचे श्री. राणे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना राणेंनी उद्धव ठाकरे व विनायक राऊत यांच्यावर प्रहार केले. तत्पूर्वी श्री. राणे यांनी वरवडे येथील श्रीदेव भैरवनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. दरम्यान, आमदार नीतेश राणे यांच्या पत्नी नंदिता राणे यांनी मतदान केले.