रवींद्र खेबुडकर यांची उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट, जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा

सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच यावेळी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत व ठेकेदारांच्या बिलाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. एप्रिल व मे महिन्यामध्ये लोकांना पाणी टंचाई भासत असून जलजीवन ची कामे पूर्ण झाल्यास नागरिकांची पाण्याची समस्या सुटू शकते त्यामुळे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा आपण तालुकावार आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली त्यावर श्री. खेबुडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.