सलग २२ व्या वर्षी बलुतेदार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष तळवडेकर.

सलग २२ व्या वर्षी बलुतेदार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष तळवडेकर.

सिंधुदुर्ग.

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील बलुतेदार सहकारी संस्था यांची सभा झाली.सभेमध्ये जिल्हा बलुतेदार कार्यकारिणी निवडण्यात आली. सलग २२ व्या वर्षी अध्यक्ष म्हणून सुभाष तळवडेकर (मालवण बलुतेदार ग्रामो. संस्था) यांची तर उपाध्यक्ष म्हणून सुरेश सुतार (कणकवली ग्रामो. संस्था) व सचिव म्हणून उल्हास मणचेकर (देवगड ग्रामो. संस्था) यांची निवड केली. सभेमध्ये संस्थेच्या नवीन सचिव नेमणुकीबाबत येणाऱ्या अडचणी, संस्थेमध्ये निर्माण होणारी अनिष्ठ तफावत कमी कशी करता येईल संस्था थकबाकीतून बाहेर कशी येईल, संस्थेला सरकारी लाभ कसे मिळवून देता येतील, या विषयी चर्चा करण्यात आली.प्रत्येक संस्थेतील चेअरमन, सचिव व संचालकानी आपले प्रश्न मांडले.सभेला कुडाळ ग्रामो. संस्थेचे चेअरमन मोहन कदम व संचालक आर्डेकर, कणकवली संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ.शीतल सावंत, संचालक सतीश मारुती जाधव व बाळकृष्ण मेस्त्री तसेच सावंतवाडी ग्रामो. संस्थेचे चेअरमन संदीप माळकर व सचिव सरिता गावडे उपस्थित होत्या.सभेच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत कणकवली चेअरमन सुरेश सुतार यांनी व आभार देवगड चेअरमन उल्हास मणचेकर यानी मानले.