सोशल मिडिया पोस्ट वरून वेंगुर्लेत तणावाचे वातावरण.

सोशल मिडिया पोस्ट वरून वेंगुर्लेत तणावाचे वातावरण.

वेंगुर्ला.

  हिंदू चे मन दुखावणारे आक्षेपार्ह विधान आणि चलचित्र सोशल मीडिया वर पोस्ट केल्या मुळे वेंगुर्ला शहरात तणाव निर्माण झाला असून शहरातील असंख्य लोक वेंगुर्ला पोलिस स्टेशन मध्ये जमा झाले होते. याबाबत भाजप युवा मोर्चा व हिंदू युवकांच्या वतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले.यावेळी जय श्री राम, हिंदू धर्म की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा पवित्रा शेकडोंच्या जमावाने घेतला. दुपारी ३ वाजल्यापासून सुरू झालेले हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरू होते.
                यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, हितेश धुरी, भूषण सारंग, परबवाडा उपसरपंच पपू परब, प्रीतम सावंत, भाई मालवणकर, अमित म्हापणकर, पंकज शिरसाट,रवी शिरसाट, प्रणव गावडे, सुधीर पालयेकर, चतुर पार्सेकर, अमित म्हापणकर, वैभव होडावडेकर, साई भोई यांच्यासाहित शेकडो हिंदू धर्मीय लोक वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या आवारात उपस्थित होते.