सावंतवाडी आजगाव येथे १७ मे रोजी बैलगाडा शर्यत स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी
शिवशक्ती मित्रमंडळ आजगाव आयोजित शिवशक्ती मैदान पांढरेवाडी येथे १७ मे ला दुपारी १ वाजता राज्यस्तरीय व तालुकास्तरीय बैलगाडी शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय खुला गटासाठी प्रथम पारितोषिक २५ हजार २५ व आकर्षक चषक, द्वितीय २० हजार २५ व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक १५ हजार २५ व आकर्षक ढाल, चौथे १२ हजार २५ व आकर्षक ढाल, पाचवे १० हजार २५ व आकर्षक ढाल, सहावे ९ हजार २५ व आकर्षक ढाल, सातवे ८ हजार २५ व आकर्षक ढाल, आठवे ७ हजार २५ व आकर्षक ढाल, नववे ६ हजार २५ आकर्षक ढाल, दहावे ५ हजार २५ व आकर्षक ढाल तसेच तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक ५ हजार ५५५ व आकर्षक ढाल, द्वितीय ३ हजार ३३३ व आकर्षक ढाल, तृतीय २ हजार २२२ व आकर्षक ढाल तसेच संपूर्ण स्पर्धेत खास आकर्षक ठरणारी बैलगाडीस बक्षिस १ हजार १११ रुपये व प्रत्येकी गाडी मालकास मंडळाकडून सन्मानचिन्ह देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मिलिंद पांढरे ८४११८३९०३८ व सुशिल कामटेकर यांच्याशी संपर्क साधावा.